मुख्य सामग्रीवर जा
+91 9561721306 bhoke1960@gmail.com

Grampanchayat Bhoke

प्रगती आणि समृद्धीची वाटचाल

माझ भोके

आमच्या गावाची ओळख

आधुनिक भोके गाव — निसर्ग, श्रद्धा आणि प्रगतीचा संगम रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी तालुक्यात वसलेले भोके गाव हे कोकण रेल्वेवरील आपल्या रेल्वे स्टेशनमुळे सर्वपरिचित आहे. हिरव्यागार डोंगरांच्या आणि निसर्गसंपन्न परिसराच्या सान्निध्यात वसलेले हे गाव आज प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करत आहे. गावात आधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध असून, मुंबई–गोवा महामार्गावरून येणारा दुपदरी रस्ता भोकेला सहज पोहोचवतो. संपूर्ण गावात नळपाणी योजना कार्यान्वित असून स्वच्छतेची चांगली व्यवस्था आहे. भोके गाव धार्मिक आणि सांस्कृतिक वारशासाठी प्रसिद्ध आहे. गावाची मुख्य ग्रामदेवता श्री सोमियाचे मंदिर मायंगडेवाडी येथे, घनदाट सुरमाडांच्या वनात वसलेले आहे. मठवाडीतील श्री मठेश्वर देवस्थान येथे दरवर्षी महाशिवरात्रीला मोठा उत्सव साजरा केला जातो. तसेच ब्राह्मणवाडीत श्री रतनेश्वरांचे, आंबेकरवाडीत श्री जांगळदेव व राधाकृष्णांचे, आणि रेवाळेवाडीत श्री गणेश व भोगदोबा देवस्थान अशी अनेक प्राचीन मंदिरे गावाच्या धार्मिक वैभवाची साक्ष देतात. गावातील शिक्षण क्षेत्र हेही विशेष उल्लेखनीय आहे. मठवाडी शाळा आणि आंबेकरवाडी शाळा या दोन्ही शाळांना ISO मानांकन प्राप्त झाले असून त्या जिल्हा परिषदेच्या आदर्श शाळा म्हणून गौरविल्या गेल्या आहेत. विशेष म्हणजे, आंबेकरवाडी शाळा मुख्यमंत्री माझी शाळा अभियानात जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर आली आहे — हा गावाचा अभिमानाचा क्षण आहे. गावातील मुख्य व्यवसाय शेती असून, अनेक शेतकरी आंबा आणि काजू बागायती करतात. नैसर्गिक संपत्ती आणि मेहनती शेतकऱ्यांमुळे भोके हे एक समृद्ध कृषीगाव म्हणून ओळखले जाते. पर्यटनाच्या दृष्टीनेही भोके प्रसिद्ध होत आहे. गावातील गोपाळ Agro Tourism हे एक आकर्षणकेंद्र आहे — नदीच्या किनाऱ्यावर वसलेले हे ठिकाण विशेषतः पावसाळ्यात असंख्य पर्यटकांना भुरळ घालते. निसर्गाच्या सान्निध्यात आणि शिक्षण–शेती–पर्यटनाच्या प्रगतीने आज भोके हे कोकणातील एक आदर्श आणि प्रेरणादायी गाव बनले आहे.

आधुनिक पायाभूत सुविधा - सिमेंट रस्ते, स्वच्छ पाणीपुरवठा
शैक्षणिक सुविधा - प्राथमिक व माध्यमिक शाळा
आरोग्य सेवा - प्राथमिक आरोग्य केंद्र

आमची दृष्टी

शाश्वत विकास, स्वच्छता, सुरक्षितता आणि सर्वसमावेशक प्रगती यांच्या बळावर आधुनिक आणि समृद्ध भोके निर्माण करणे.

आमचे ध्येय

प्रत्येक कुटुंबापर्यंत सुविधा, प्रत्येक हाताला काम, आणि प्रत्येक मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करणे.

आमच्या यशोगाथा

उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार

जिल्हास्तरीय

स्वच्छता अभियान आणि पायाभूत सुविधा विकासासाठी

हरित गाव पुरस्कार

राज्यस्तरीय

वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनासाठी

डिजिटल इंडिया पुरस्कार

डिजिटल सेवा आणि ई-गव्हर्नन्ससाठी